पुढारी वृत्तसेवा
निरोगी किडनीवर परिणाम:
जर तुमची किडनी पूर्णपणे निरोगी असेल, तर मर्यादित प्रमाणात प्रोटीन शेक घेतल्याने किडनी फेल होत नाही.
आधीपासून असलेले आजार:
ज्यांना आधीच किडनीचे विकार किंवा 'क्रॉनिक किडनी डिसीज' आहे, त्यांच्यासाठी जास्त प्रोटीन घेणे किडनीवर प्रचंड ताण आणू शकते.
युरिया आणि क्रिएटिनिन:
शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रोटीन गेल्यावर किडनीला ते फिल्टर करण्यासाठी जास्त काम करावे लागते, ज्यामुळे युरियाचा स्तर वाढू शकतो.
पाण्याचे प्रमाण:
प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला जास्त पाण्याची गरज असते. जर तुम्ही पाणी कमी प्यायलात, तर किडनीमध्ये खडे (Stone) होण्याचा धोका वाढतो.
बोगस उत्पादनांपासून सावधान:
बाजारपेठेत मिळणाऱ्या स्वस्त किंवा भेसळयुक्त प्रोटीन पावडरमध्ये स्टेरॉइड्स असू शकतात, जे खरोखरच किडनी निकामी करू शकतात.
प्रथिनांचे योग्य प्रमाण:
सामान्यतः एका निरोगी व्यक्तीला प्रति किलो वजनामागे ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीनची गरज असते. हे प्रमाण ओलांडल्यास त्रास होऊ शकतो.
नैसर्गिक स्रोतांना प्राधान्य:
शक्य असल्यास अंडी, डाळी, पनीर आणि सोयाबीन यांसारख्या नैसर्गिक पदार्थांमधून प्रोटीन मिळवण्याचा प्रयत्न करावा.
जिम ट्रेनरच्या सांगण्यावरून प्रोटीन सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि किडनी फंक्शन टेस्ट (KFT) करावी.
प्रोटीन शेक हे अन्नाला पर्याय नसून ते फक्त सप्लिमेंट आहे; वर्षानुवर्षे फक्त त्यावर अवलंबून राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.