पुढारी वृत्तसेवा
HealthyLivingआजच्या फॅशन ट्रेंडमध्ये टाइट फिटिंग जीन्सला मोठी पसंती मिळत आहे. मात्र हा स्टाइल आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
खूप घट्ट जीन्स परिधान केल्यामुळे शरीराला हवा नीट मिळत नाही, त्यामुळे घाम आणि ओलावा वाढतो.
ओलसर वातावरणात बॅक्टेरिया आणि फंगस झपाट्याने वाढतात, त्यामुळे महिलांमध्ये योनी संक्रमणाचा धोका वाढतो.
या संसर्गामुळे खाज, जळजळ, दुर्गंधी आणि असामान्य डिस्चार्जसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
काही वेळा संसर्ग गंभीर झाल्यास डॉक्टरांकडून औषधोपचार आणि दीर्घ उपचारांची गरज भासू शकते.
टाइट जीन्समुळे त्वचेवर घर्षण वाढते, त्यामुळे रॅशेस, लालसरपणा आणि स्किन ॲलर्जी होऊ शकते.
खूप घट्ट कपड्यांमुळे शरीराच्या खालच्या भागातील रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे झिणझिण्या आणि सुन्नपणा जाणवू शकतो.
सतत टाइट कपडे घातल्याने पेल्विक भागावर ताण येतो, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते.
टाइट जीन्स पोटावर दबाव आणते, त्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, कॉटनचे आणि थोडे सैल कपडे वापरणे, नियमित कपडे बदलणे,स्वच्छ सूती अंतर्वस्त्रे वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ञांचा सल्ला घेउनच आचरण करावे..