तुम्ही प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वापरता का? पुढे धोका आहे...

पुढारी वृत्तसेवा

किचनमध्ये फळे, भाज्या चिरण्यासाठी आणि इतर कामासाठी चॉपिंग बोर्ड वापरला जातो.

वापरायला सोपा, हलका, स्वच्छ करायला सोयीस्कर आणि स्वस्त प्लास्टिक चॉपर बोर्ड वापरला जातो.

सोयीस्कर आणि आकर्षक वाटणारा हा चॉपर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

जेंव्हा भाजी, फळे चिरण्यासाठी आपण चाकू वापरतो तेंव्हा प्लास्टिकचे छोटे कण अन्नात मिसळू शकतात.

हे मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात गेल्याने बॅक्टेरियामुळे ओरोग्यावर घातक परिणाम होउ शकतो.

काही प्लास्टिकमध्ये हानिकारक रसायने असतात, शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करू शकतात.

या घातक रसायनांमुळे कालांतराने प्रजनन क्षमता आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होउ शकतो.

मायक्रोप्लास्टिकमुळे आतड्यांचे विकार, हद्यविकार आणि गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो.

चॉपिंग बोर्ड प्लास्टिकचा असो वा लाकडी चाकूने चिरल्यावर त्‍यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात.

धोका टाळण्यासाठी चॉपिंग बोर्ड वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्‍यासाठी लिंबू, स्क्रबचा वापर करावा. वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. वाचकांनी तज्ञांचा सल्ला घेउनच आचरण करावे.