पुढारी वृत्तसेवा
मोबाईल स्क्रोल करत बसण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, डॉक्टरांनी याबाबत इशारा दिला आहे.
आजकाल अनेकजण वॉशरूममध्ये मोबाइल घेऊन जातात. रील्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओ पाहता पाहता वेळ कसा जातो, कळतही नाही.
डॉक्टरांच्या मते, रोज टॉयलेट सीटवर 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
जास्त वेळ बसल्याने गुदद्वाराजवळील नसांवर दबाव वाढतो. त्यामुळे सूज येऊन पाइल्स (मुळव्याध) होण्याचा धोका वाढतो.
पाइल्स झाल्यास मलविसर्जनावेळी वेदना, खाज किंवा रक्तस्रावासारख्या समस्या जाणवू शकतात.
वेस्टर्न कमोडवर बसण्याच्या पद्धतीमुळे रेक्टल भागावर अधिक दबाव येतो. फोन वापरत जास्त वेळ बसलात तर धोका आणखी वाढू शकतो.
‘पोट साफ होईल’ म्हणून जास्त वेळ बसल्याने बद्धकोष्ठता उलट वाढू शकते. यामुळे स्नायूंवर ताण येतो.
जास्त जोर लावल्यास एनल फिशर किंवा रेक्टल प्रोलॅप्ससारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
मोबाइलचा वापर कमी करा, फायबरयुक्त आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा.