Hair Care Tips: केस धुताना शॅम्पू दोनदा लावावा का? काय सांगतात तज्ज्ञ...

पुढारी वृत्तसेवा

डबल-वॉशिंग म्हणजे एकाच वेळी केस धुताना दोनदा शॅम्पूचा वापर करणे आवश्यक आहे का?

तज्ज्ञांच्या मते, पहिल्यांदा शॅम्पू लावल्याने केसांवरील धूळ, घाम, प्रदूषण आणि वरवरचे तेल निघून जाण्यास मदत होते.

तर, दुसऱ्यांदा शॅम्पू लावल्याने शॅम्पूमधील सक्रिय घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि टाळू खोलवर स्वच्छ होते.

कोणासाठी आहे फायदेशीर?

1. ही पद्धत सर्वांसाठी नसून विशिष्ट लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते:

2. ज्यांचा टाळू अत्यंत तेलकट आहे.

3. ज्यांच्या केसांमध्ये कोंडा आहे.

4. जे लोक रोज प्रदूषणात वावरतात किंवा हेअर स्टायलिंग उत्पादनांचा (जेल, स्प्रे) वापर करतात.

5. नियमित व्यायाम करणारे लोक, ज्यांना जास्त घाम येतो.

तोटेही लक्षात घ्या!

प्रत्येक वेळी केस दोनदा धुण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते.

यामुळे केस कोरडे आणि राठ होऊ शकतात.

केसांची टोके दुभंगणे किंवा केस तुटण्याचे प्रमाण वाढू शकते.

टाळूची त्वचा संवेदनशील होऊन खाज सुटू शकते.

किती वेळा करावे 'डबल वॉश'?

तेलकट त्वचा: आठवड्यातून २ ते ३ वेळा.

सामान्य त्वचा: आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा केसांना खूप घाण लागली असेल तेव्हाच.