एका खोलीतून दुसर्‍या खोलीत गेल्यानंतर गोष्टी विसरतांय? जाणून घ्या धक्कादायक सत्य

पुढारी वृत्तसेवा

कधी अचानक काही विसरता?

एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यावर कामच विसरता? तुम्ही एकटे नाही!

यालाच म्हणतात ‘डोरवे इफेक्ट’

तज्ज्ञांच्या मते ही एक सामान्य मेंदूची प्रक्रिया आहे.

मेंदू कसा काम करतो?

मेंदू माहिती साठवण्यासाठी “इव्हेंट मॉडेलिंग” तंत्र वापरतो.

दरवाजा म्हणजे नवा अध्याय

एका खोलीतून दुसऱ्यात जाताना मेंदू जुना अध्याय संपल्यासारखा मानतो.

मोबाईलसारखी प्रक्रिया

जसं एक अ‍ॅप बंद करून दुसरं उघडतो, तसंच मेंदू जुनं विसरतो.

म्हणूनच काम विसरता

नवीन जागेत गेल्यावर मेंदू तिथल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.

हे वाईट नाही!

उलट, तुमचा मेंदू वेगाने adapt होतो याचा हा संकेत आहे.

पण हे वारंवार होत असेल तर…

बोलताना, चालताना सतत विसर पडत असेल तर सावध व्हा.

यामागे काय कारण असू शकतं?

अतिताण, कमी झोप आणि मानसिक थकवा यामुळेही विसरभोळेपणा वाढतो.