भाजी करताना तुम्हीही करता का ही चूक? पोषक तत्‍व होतील नष्ट..

पुढारी वृत्तसेवा

आपल्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश असण आरोग्यासाठी आवश्यक आहे. यातून पोषक तत्‍व मिळतात. पचनक्रियाही चांगली राहते.

भाज्या बाजारातून आणल्यावर त्‍या योग्य पद्धतीने बनवणे आवश्यक आहे. अन्यथा त्‍यातील पोषक घटक नष्ट होण्याचा धोका असतो.

भाज्या शिजवताना मात्र काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर भाज्यांमधील पोषक तत्‍व आपल्याला मिळणार नाहीत.

आपल्याकडे सर्व ऋतूत वेगवेगळ्या भाज्या मिळतात. त्‍या सर्वांचा आहारात समावेश करावा. यातून फायबरही मिळते.

आज भाज्यांवर मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी होते. त्‍यामुळे भाज्या चिरण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मगच बनवाव्यात.

कधीही भाज्या चिरून धुवू नये. यामुळे त्‍यातील जीवनसत्‍वे नष्ट होतात.

हिवाळ्यात मिळणाऱ्या मेथी, पालक, मोहरी, पोकळा, राजगिरा, गाजर, मुळा या भाज्या धुवूनच चिराव्यात.

हिरव्या भाज्या जास्त शिजवू नयेत, यामुळे त्‍यातील पोषक तत्‍व नष्ट होतात.