पुढारी वृत्तसेवा
चित्रपटांमध्ये आपण पाहतो, साप मारला की नागीण बदला घेण्यासाठी येते. पण यामागचं खरं विज्ञान काय सांगतं? जाणून घ्या
चित्रपट, लोककथा आणि अंधश्रद्धेमुळे “साप बदला घेतात” ही गोष्ट लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे.
वैज्ञानिकांच्या मते सापाचा मेंदू इतका विकसित नसतो की तो एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवू शकेल.
सापांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सांगतात की साप बदला घेतात हे फक्त मिथक आहे. त्यांच्याकडे सूडभावना नसते.
साप मेल्यानंतर त्याच्या शरीरातून फेरोमोन नावाचे रसायन बाहेर पडते. त्यामुळे दुसरे साप त्या जागेकडे आकर्षित होऊ शकतात.
लोकांना वाटतं नागीण बदला घ्यायला आली आहे. पण प्रत्यक्षात ती फक्त त्या रसायनांच्या वासामुळे तिथे पोहोचते.
निव्वळ योगायोग असू शकतो. त्या परिसरात साप जास्त असतील तर वारंवार साप चावतो
साप सहसा स्वतःच्या बचावासाठी चावतात. त्यांना धोका वाटला किंवा कोणी छेडलं तरच ते हल्ला करतात.
पूर्वी लोकांनी विनाकारण साप मारू नयेत म्हणून अशा कथा तयार झाल्या असाव्यात, असं काही तज्ज्ञ मानतात.
साप बदला घेत नाहीत. हे फक्त चित्रपट आणि लोककथांमध्ये आपल्याला दिसतं. विज्ञान मात्र याला पूर्णपणे नाकारतं