पुढारी वृत्तसेवा
भारतात नवीन कार खरेदी करण्यासाठी दिवाळी हा सर्वात शुभ काळ मानला जातो. या काळात ऑटोमोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स देतात, ज्यामुळे खरेदीचा उत्साह आणखी वाढतो.
पण, कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी 'प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन' पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तुमची कार 'परफेक्ट' आहे, याची खात्री करा!
दिवसाच्या प्रकाशात पेंटवर कुठेही स्क्रॅच, डेंट किंवा रंगात असमानता नाही ना, हे तपासा. दरवाजे, बोनेट सहज उघड-बंद होतात की नाही, पाहा.
सर्व टायर नवीन, एकाच ब्रँडचे आणि स्टेपनी व्यवस्थित आहे का, हे चेक करा.
विंडशील्ड आणि खिडक्यांच्या काचा ओरखडा-रहित असाव्यात.
केबिनमध्ये बसून सर्व फीचर्स तपासा
AC, म्युझिक सिस्टम, पावर विंडो, हॉर्न, वायपर तपासा.
हेडलाईट, टेललाईट, फॉग लाईट आणि इंडिकेटर व्यवस्थित आहेत की नाहीत, पाहा.
बोनेटखाली एक नजर टाका. तेल गळती, वायरिंग सैल किंवा सुटलेले भाग तपासा. तसेच, इंजिन ऑइल, ब्रेक फ्लुइड योग्य आहे का ते तपासा.
या ठिकाणी बहुतेक लोक चूक करतात. डिलिव्हरी घेताना, प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक तपासा. इनव्हॉईस, इन्शुरन्स आणि RC पेपर व्यवस्थित चेक करा.
डिलिव्हरी नोटवर सही करण्यापूर्वी कारला पार्किंग एरियात थोडी चालवून पाहा.