मोनिका क्षीरसागर
दिवाळी म्हणजे केवळ भारताची नव्हे, तर जगभरातील भारतीयांचीही ओळख बनलेला सण आहे.
अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत, अनेक देशांमध्ये दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळतो.
विशेष म्हणजे सिंगापूर, मलेशिया, आणि फिजी या देशांमध्ये दिवाळीला सार्वजनिक सुट्टी असते.
ब्रिटनमध्ये लंडनच्या ट्राफलगर स्क्वेअरवर दरवर्षी भव्य दिवाळी महोत्सव साजरा होतो.
अमेरिका, कॅनडा आणि दुबईतही भारतीय समुदायात दिवे लावणे, मिठाई वाटप आणि फटाके फोडणे अशी परंपरा टिकून आहे.
सिंगापूरच्या लिट्ल इंडिया भागात रंगीबेरंगी लाईट्स आणि सजावट दिवाळीच्या आगमनाची चाहूल देतात.
फिजीमध्ये दिवाळी हा राष्ट्रीय उत्सव असून सर्व धर्मातील लोक उत्साहाने सहभागी होतात.
दिवाळी आता जागतिक पातळीवर ‘फेस्टिव्हल ऑफ लाइट्स’ म्हणून भारतीय संस्कृतीचा संदेश पोहोचवत आहे.