Disha Patani: दिशा पटानीची महागडी साडी बघाच! काय तिच्या कातील अदा आणि सौंदर्याची जादू!

पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नुकताच प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेली लाल रंगाची कांजीवरम कॉर्सेट साडी परिधान केली होती.

दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

अलीकडेच प्रसिद्ध पंजाबी गायक 'तळविंदर'सोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे ती चर्चेत आली होती.

आता दिशाने तरुण ताहिलियानीच्या लाल कॉर्सेट साडीतील काही मोहक फोटो शेअर केले आहेत.

दिशाने नेसलेली ही कांजीवरम कन्सेप्ट साडी डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी साकारली आहे.

या कॉर्सेट ब्लाउज साडीची किंमत तब्बल ५,५८,२०० रुपये असल्याची समजते.

सहसा पाश्चात्य पेहरावात दिसणारी दिशा या 'देसी' लूकमध्येही तितकीच सुंदर दिसत आहे.

साडीला साजेसे असे सोन्याचे जड ईअररिंग्स आणि नेकलेस परिधान करून तिने आपला लूक पूर्ण केला.