पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या एका बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
यावेळी दिशाने 'बॅकलेस' रिव्हिलिंग रेड गाऊन परिधान करून सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतल्या आहेत.
लाल रंगाच्या या हाय-स्लिट गाऊनमध्ये दिशाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
तिच्या या सिझलिंग लूकने इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवला असून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमुळे तिचा हा लूक अधिकच 'किलर' आणि बोल्ड झाला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, "दिशाने तर खरंच कहर केला आहे!" तर दुसऱ्याने तिला "नॅशनल क्रश" म्हटले आहे.
नेहमीच आपल्या फिटनेसबद्दल सजग असणाऱ्या दिशाने या फोटोशूटमध्ये तिची फिटनेस लेव्हल पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
तिची ही स्टाईल आणि फॅशन सेन्स सोशल मीडियावर सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे.