पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूडची 'बोल्ड' गर्ल दिशा पटानी तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
बिकिनी आणि हॉट फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेल्या दिशाला तिचा २०१८ सालचा दिवाळीचा लूक चांगलाच महागात पडला होता.
२०१८ मध्ये दिशा पटानीने धनत्रयोदशीच्या दिवशी तिच्या सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला होता.
या फोटोद्वारे तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मात्र, तिच्या कपड्यांमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
दिशाने या फोटोशूटमध्ये एका ब्रँडचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिने केलेल्या स्टायलिंगमुळे वाद निर्माण झाला.
नेहमीच्या पद्धतीनुसार लहेंग्यावर चोळी घालण्याऐवजी दिशाने कॅल्विन क्लीन या ब्रँडचे Innerwear परिधान केले होते.
पारंपरिक लहेंग्यावर असे बोल्ड आणि पाश्चात्त्य स्टायलिंग पाहून अनेक चाहते आणि सोशल मीडिया युजर्स चांगलेच भडकले.
एखादी अभिनेत्री केवळ तिच्या कपड्यांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ होती
ही घटना दिशा पटानीसाठीही खूप वाईट आणि धक्कादायक होती.