Namdev Gharal
जगातील एक जमात अशी आहे की ज्यांची सरासरी उंची साडेसहा फूट इतकी असते जगात कोणत्याही देशातील लोकांमध्ये ही उंची सर्वाधिक मानली जाते. जाणून घेऊ यांच्याविषयी
या जमातिचे नाव आहे डींका या जमातीतील लोकांची गणना जगातील सर्वात उंच लोकांमध्ये होते. येथील पुरुषांची सरासरी उंची साधारणपणे ६ फूट ४ इंच (१९३ सेमी) तर महिलांची सरासरी उंची ६ फूट (१८२ सेमी) च्या आसपास असते.
डींका हे आफ्रिका खंडातील दक्षिण सुदान या देशामध्ये हे लोक राहतात. हा दक्षिण सुदानमधील सर्वात मोठे समूह आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोकसंख्या एकट्या डींका जमातीची आहे.
एवढे उंच कसेः शास्त्रज्ञांच्या मते, त्यांची ही अफाट उंची उत्तम अनुवंशिकता (Genetics) आणि त्यांच्या आहारावर अवलंबून आहे. त्यांचा मुख्य आहार दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि सेंद्रिय धान्यांनी समृद्ध असतो.
कोणत्याही ठिकाणी गेल्यावर डिंका लोक सहज ओळखून येतात कारण त्यांची ताडमाड उंची इतर सामान्य उंचीच्या लोकांसमोर खूप मोठी दिसून येते
बास्केटबॉलमधील दबदबा: त्यांच्या नैसर्गिक उंचीमुळे डींका जमातीचे लोक बास्केटबॉल खेळात खूप यशस्वी होतात. प्रख्यात NBA खेळाडू मानुते बोल (Manute Bol) (उंची: ७ फूट ७ इंच) हे याच डींका जमातीचे होते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डींका लोकांचे जीवन त्यांच्या गुरांभोवती विशेषतः मोठ्या शिंगांच्या अँकोले-वातुसी या जातीच्या गाईभोवती फिरते. गाय हे त्यांच्यासाठी केवळ पशुधन नसून ती संपत्ती, प्रतिष्ठा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.
अनेकदा डींका पुरुष आपल्या आवडत्या बैलाचे किंवा गाईचे नाव स्वतःच्या नावाचा भाग बनवतात. गुरांच्या रंगावरून आणि शिंगांच्या आकारावरून मुलांची नावे ठेवण्याची गल्लत येथे सर्रास पाहायला मिळते.
अंगाला राख लावण्याची परंपरा: डींका लोक डास आणि कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या अंगाला शेणाची राख (Cow dung ash) लावतात. यामुळे त्यांना एक विशिष्ट राखाडी रंग मिळतो.
प्रौढत्वात पदार्पण करताना मुलांच्या कपाळावर चाकूने किंवा तीक्ष्ण वस्तूने विशिष्ट नक्षीदार जखमा केल्या जातात. या खुणा त्यांच्यासाठी शौर्य आणि जमातीचा अभिमान दर्शवतात.
लग्नात गाईंचे हुंडा म्हणून महत्त्व: या जमातीत लग्नासाठी हुंडा म्हणून गाई दिल्या जातात. एका मुलीच्या लग्नासाठी मुलाकडच्यांना काही डझनांपासून ते शेकडो गाई मुलीच्या कुटुंबाला द्याव्या लागतात.
हे लोक निसर्गाची पूजा करतात आणि त्यांचे स्वतःचे 'न्हालिक' (Nhalic) नावाचे सर्वोच्च दैवत आहे. ते आपल्या गुरांसाठी आणि सणांसमारंभांत अत्यंत लयबद्ध गाणी गातात आणि नृत्य करतात.