पुढारी वृत्तसेवा
निसर्ग अनेक रहस्यमयी घटनांनी भरलेला आहे.
इथे अनेक प्रकारचे प्राणी राहतात अन् त्यातील काही प्रण्यांच्या मुलखावेगळ्या सवयी असतात. ज्या कधी कधी आपल्याला माहीतही नसतात.
पण जेव्हा माहिती होतात तेव्हा त्या ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
निसर्गातील बहुतेक सर्व जीव सहसा डोळे बंद करूनच झोप घेतात.
मात्र, जिराफसारखे उंच मानेचे प्राणी मात्र शिकार करणाऱ्या हिंस्र प्राण्यांपाासून स्वत:च्या बचावासाठी तसेच आजूबाजूला लक्ष राहावे म्हणून उभे राहून व डोळे उघडे ठेवूनच झोप घेतात.
मगरही पाण्याजवळ आराम करताना डोळे पूर्णपणे बंद करत नाही.
कारण शिकार आणि अन्य धोक्यांपासून बचाव होण्यासाठी तिला असे करावे लागते.
तसेच, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापांच्या डोळ्यावर पापण्यांऐवजी एक पारदर्शक पडदा असतो, जो त्यांच्या झोपेच्या वेळी खाली ओढलेला असतो.
पण पाहणाऱ्याला मात्र सापाचे डोळे उघडे असल्याचा भास होतो. आहे की नाही आश्चर्य.