पुढारी वृत्तसेवा
नुकताच झालेल्या एका संशोधनात, शाकाहारी आहारामध्ये इतर चांगल्या आहारांइतकीच पोषक तत्त्वे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०२४ मध्ये झालेल्या एका संशोधनात असे निदर्शनास आले की, वनस्पती-आधारित आहार (म्हणजे ज्यात जास्त भाज्या, फळे असतात) खाण्याचे खूप फायदे आहेत. हा आहार मधुमेह आणि हृदयविकार होण्यापासून वाचवण्यासाठी खूप उपयोगी ठरतो.
संशोधनातून दिसून आले आहे की, नुसता कमी-कार्ब (Low-carb) आहार घेण्याऐवजी, शाकाहारी आहार मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी जास्त प्रभावी आहे.
तुमच्या रोजच्या जेवणात भाज्या आणि फळे, संपूर्ण धान्य (जसे की गहू, बाजरी, ज्वारी), डाळी, शेंगा आणि नट-बिया या गोष्टी जास्त प्रमाणात असाव्यात.
तुम्हाला मांसाहार पूर्णपणे सोडायची गरज नाही. शाकाहारी आहाराचा अर्थ आहे की, तुमच्या जेवणामध्ये मुख्य घटक मांसाहार नसावा, तर भाज्या आणि वनस्पतीजन्य पदार्थ असावेत.
बाजारात मिळणारे खूप प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ खाणे टाळा. चांगले आणि पौष्टिक शाकाहारी पदार्थ निवडा, असे अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) सांगते.
यावर्षी झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, डॉक्टरने सांगितल्यास अमेरिकेतील बरेच लोक शाकाहारी आहार स्वीकारतील; पण फक्त २०% लोकांनाच माहित आहे की, शाकाहारी आहारामुळे टाईप २ मधुमेह टाळता येतो किंवा नियंत्रित ठेवता येतो.
जर तुम्ही प्राणीजन्य (Animal) उत्पादने जास्त खात असाल, तर टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. संशोधनात असे आढळले की, शाकाहारी आहार घेणाऱ्या ४३ टक्के लोक त्यांच्या मधुमेहाची औषधे कमी करू शकले किंवा बंद करू शकले. तर दुसऱ्या गटात हे प्रमाण फक्त २६ टक्के होते.
आहारतज्ज्ञ सांगतात की, आठवड्यातून एकदा पूर्णपणे शाकाहारी जेवण घ्या.त्यानंतर हळूहळू शाकाहारी जेवणाचे दिवस वाढवा.