मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकीच ती गोष्ट कोणत्या वेळी खाल्ली जाते हे देखील महत्त्वाचे असते.
योग्य फळ योग्य वेळी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी किंवा दिवसाच्या वेळी फळे खाणे अधिक फायदेशीर ठरते.
याचे मुख्य कारण म्हणजे या काळात शरीराची चयापचय क्रिया सक्रिय असते. यामुळे फळांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक साखरेचा वापर शरीर ऊर्जा म्हणून प्रभावीपणे करू शकते.
अनेकदा सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात फळे खाल्ली जातात. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी असे करणे टाळावे.
एकाच वेळी जास्त फळे खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता असते.
तसेच रात्रीच्या वेळी फळे खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी नुकसानकारक ठरू शकते.