ध्रुव राठीच्या जर्मन पत्‍नीची का होते इतकी चर्चा? ७ वर्षांच्या डेटिंगनंतर थाटला संसार!

पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीला CJP आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले.

यानंतर ध्रुव राठीच्या कुटुंबाबद्दल आणि पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी लोक इंटरनेटवर सर्च करत आहेत.

ध्रुव राठीच्या पत्नीचे नाव जूली एलबीआर-राठी (Juli Lbr-Rathi) आहे. ती जर्मनीची नागरिक असून तिचे शिक्षणही जर्मनीत झाले आहे.

जूली ही हेल्थकेअर प्रोफेशनल असून कंटेंट क्रिएटर म्हणूनही काम करते. ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

ध्रुव राठी आणि जूली यांची पहिली भेट २०१४ मध्ये जर्मनीत झाली होती. त्यावेळी ध्रुव इंटर्नशिपसाठी जात होता, तर जूली शाळेत जाण्यासाठी निघाली होती.

जर्मनीतील ट्राममध्ये झालेली ध्रुव आणि जूली यांची पहिली भेट हळूहळू प्रेमात बदलली.

पहिल्या भेटीनंतर ध्रुव आणि जूली यांनी तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली.

ध्रुव राठी आणि जूली यांनी लग्नाच्या तीन वर्षांनंतर, म्हणजेच २०२४ मध्ये, आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले.

ध्रुव आणि जूली या दोघांनाही फिरण्याची खूप आवड आहे. ते अनेकदा प्रवासातील फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

जूली इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे, तिचे 387K फॉलोअर्स आहेत. सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.