Namdev Gharal
भारत एक कला अशीही आहे की जिचा इतिहास थेट मोंहजोदाडोपर्यंत जातो. मोहेंजोदडोची प्रसिद्ध "नृत्यांगना" मूर्ती याच तंत्राने बनवलेली आहे. त्यामुळे या कलेला ४००० वर्षांचा इतिहास आहे
ही कला म्हणजे भारतातील प्राचीन धातूकला ढोकरा होय. यामध्ये ती "लॉस्ट-वॅक्स कास्टिंग" Lost-Wax Casting पद्धतीने मुर्ती बनवल्या जातात.
पश्चिम बंगाल आणि ओडिशातील 'ढोकरा डामर' या भटक्या जमातीतील कारागिरांच्या नावावरून या कलेला 'ढोकरा कला' असे नाव पडले.
ही कला छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशात प्रचलित आहे. छत्तीसगडमधील बस्तर आणि ओडिशातील धेंकनाल येथील ढोकरा विशेष प्रसिद्ध आहे.
प्रथम मातीचा एक कच्चा साचा तयार करून तो वाळवला जातो. त्यावर मधमाशांचे मेण, झाडाचा डिंक आणि मोहरीच्या तेलाच्या मिश्रणातून तयार केलेल्या बारीक तारा गुंडाळून नक्षीकाम केले जाते.
या मेणाच्या नक्षीकामावर पुन्हा मातीचे थर लावले जातात. साचा भट्टीत तापवल्यावर आतील मेण वितळून बाहेर पडते आणि त्याची पोकळी तयार होते.
त्या पोकळीत वितळलेले तांबे, पितळ किंवा कांस्य ओतले जाते. थंड झाल्यावर बाहेरील मातीचे कवच फोडून आतली कलाकृती बाहेर काढली जाते आणि तिला झिलाई दिली जाते.
ढोकरा शिल्पांवर बारीक तारांसारखे विणकाम दिसते, जे त्यांना एक वेगळीच ग्रामीण आणि प्राचीन झळाळी देते. कोणत्याही आधुनिक यंत्राचा वापर न करता पूर्णपणे हाताने आणि नैसर्गिक कच्च्या मालाचा वापर करून या वस्तू बनवल्या जातात.
यामध्ये प्रत्येक मूर्ती स्वतंत्रपणे साच्यात बनवली जात असल्याने कोणतीही दोन शिल्पे एकसारखी नसतात. प्रत्येक मूर्तीसाठी साचा फोडावा लागतो, त्यामुळे प्रत्येक वस्तू एकमेवाद्वितीय असते.
यामध्ये निसर्ग, आदिवासी जीवनशैली, ग्रामदेवता, हत्ती, घोडे, मोर, कासव, दिवे, दागिने आणि नृत्य करणाऱ्या मानवी आकृत्या प्रामुख्याने पाहायला मिळतात
या कलेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन पश्चिम बंगालमधील 'बांकुरा ढोकरा' आणि छत्तीसगडमधील 'बस्तर ढोकरा' या कलांना भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त झाले आहे.