पुढारी वृत्तसेवा
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील खल पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.
अलीकडेच धनश्री काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने गर्द पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
याला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या हिरव्या बांगड्याही तिने घातल्या आहेत
या लूकसोबत तिने कुंदन ज्वेलरी कॅरी केली आहे. यासोबतची नथ तिच्या लूकला चार चाँद लावत आहेत.
धनश्रीचा हा लूक तुम्ही कोणत्याही सेमी फॉर्मल कार्यक्रम, छोटे सोहळे किंवा एखाद्या सणादिवाशीही सहज कॅरी करू शकता.