Deshi vs Regular bananas : देशी केळी व साधी केळीमध्ये काय फरक?

पुढारी वृत्तसेवा

केळी हा आपल्याकडे सहज उपलब्ध होणारे फळ आरोग्यासाठीही उपयुक्त पण सहज मिळणारी साधी केळी योग्य की अस्सल देशी केळी यातील फरक व फायदे पाहूया

आरोग्याचा विचार केला तर देशी केळी (जसे की वेलची, लाल केळी किंवा बसराई) ही नेहमीच अधिक चांगली ठरतात. तर सहज उपलब्ध होणारी केळी संकरीत किंवा संशोधित वाणाची असतात

देशी केळी बहुतेकदा नैसर्गिकरीत्या पिकवली जातात. याउलट, रोजची मोठी केळी (उदा. G9) मोठ्या प्रमाणावर साठवणुकीसाठी कच्ची तोडून कृत्रिमरीत्या (इथिलीन गॅस किंवा काही ठिकाणी रसायने वापरून) पिकवली जातात.

यामुळे साधी केळी घेताना ती पूर्ण पिवळी-जर्द आणि कृत्रिमरीत्या चकचकीत दिसण्याऐवजी सालीवर थोडे काळे ठिपके असलेली निवडावीत, ती योग्य ठरतात

देशी केळी आकाराने लहान किंवा मध्यम असतात. साल पातळ असते आणि पिकल्यावर त्यावर नैसर्गिक काळे ठिपके लवकर पडतात. तर साधी केळी आकाराने मोठी, लांब आणि एकसारखी असतात. साल जाड असते आणि पिकल्यावरही ती चकचकीत व आकर्षक पिवळी दिसतात.

देशी केळ्यामध्ये फायबर , पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. पण संकरित व रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे सूक्ष्म पोषक घटकांचे प्रमाण देशी केळ्यांपेक्षा थोडे कमी असते.

देशी केळ चवीला अत्यंत गोड, रसाळ आणि याला एक प्रकारचा नैसर्गिक मंद सुगंध (उदा. वेलची केळी) असतो. तर साधी केळी चवीला तुलनेने कमी गोड आणि थोडीशी पांचट किंवा सौम्य लागतात; याला विशेष सुगंध नसतो.

देशी केळीचे साल पातळ असल्याने पिकल्यानंतर २-३ दिवसांत ती खूप मऊ पडतात किंवा खराब होऊ लागतात. तर साध्या केळांचे साल जाड असल्याने ती वाहतुकीत खराब होत नाहीत आणि पिकल्यानंतरही ४-५ दिवस टवटवीत राहतात.

संकरित जातींच्या तुलनेत देशी वाणांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B6 आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम असते.