रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अनेक जण टाळतात. यामागे जागरूकतेचा अभाव जीवनशैलीशी संबंधित कारणे आहेत. .रात्रीच्या वेळी थकवा, विसरभोळेपणा किंवा रात्री दात घासणे तेवढे महत्त्वाचे नाही असे समजले जाते. .प्रत्यक्षात रात्री दात न घासल्यास अन्नकण व बॅक्टेरिया तोंडात रात्रभर राहतात. .त्यातून कीड, हिरड्यांचा आजार व हिरड्यांची सूज, दुर्गंधी व इतर गंभीर समस्या उद्भवतात..झोपण्यापूर्वी दात घासल्याने हे सगळे नुकसान टळते. .फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने इनॅमल मजबूत होते. आम्लाच्या हल्ल्यांपासून बचाव होतो..मुखारोग्य हे हृदयविकार, मधुमेह व श्वसनविषयक आजारांशी संबंधित आहे. योग्य स्वच्छतेमुळे हे धोके कमी होतात..दिवसातून दोन वेळा दात घासणे हे केवळ दात-हिरड्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे..लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.