Namdev Gharal
स्पेनमध्ये 27 मार्च 1977 मध्ये झालेल्या टेनेराईफ या विमान अपघातात 583 लोकांचा जीव गेला होता. हे विमान 747 एस हे होते.
जपान एअर लाईनची फ्लाईट 123 हे विमान गुमा जपान येथे कोसळले या दुर्घटनेत 520 जणांनी आपला प्राण गमावला होता
हरयाणा भारत याठिकाणी 12 नोव्हेंबर 1996 मध्ये दोन विमानांची हवेतच धडक झाली यामध्ये 349 प्रवाशी ठार झाले साऊदी 747 व कझाकीस्तानचे II-76 ही दोन विमाने धडकली होती.
तुर्कीश एअरलाइन्स फ्लाइट 981 या विमानांचा दरवाजा सुटून नियत्रण सुटले व ते पॅरीसजवळ क्रॅश झाले ही 3 मार्च 1974, यामध्ये 346 जण मृत्यूमुखी पडले.
19 ऑगस्ट 1980, रियाध, सौदी अरेबिया येथे साऊदिया फ्लाइट 163 क्रमांकाच्या विमानात आग लागल्यामुळे दुर्घटना घडली होती यामध्ये 301जण ठार झाले होते.
मलेशिया एअरलाइन्सचे फ्लाइट 17 ही 17 जुलै 2014, युक्रेनमध्ये Boeing 777 क्षेपणास्त्राने पाडले गेले यातील 298 प्रवासी मारले गेले.
3 जुलै 1988, पर्शियन खाडीमध्ये ईराण एअर फ्लाइट 655 या क्रमांकाचे Airbus A300 हे विमान अमेरीकेच्या नेव्हीच्या क्षेपणास्त्राने पाडले यातील सर्व 290 जण ठार झाले.
शिकागो, अमेरिका येथे अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट 191 हे 25 मे 1979 रोजी दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये 273 जण ठार झाले होते या विमानाचे इंजिन अचानक तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली होती.
अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 587 या विमानाचे पाठीमागील पंख तुटल्यामुळे अपघात झाला हा 12 नोव्हेंबर 2001, न्यर्याक येथे घडलेल्या या अपघातात 260 जण मरण पावले.
आर्यलंडजवळ एअर इंडियाचे फ्लाइट 182 हे विमान 23 जून 1985, रोजी बॉम्बस्फोटामुळे हवेतच फुटले यामध्ये 329 जण ठार झाले.