De Brazza Monkey |मठात राहणाऱ्या साधूसारखे दिसणारे दाढीवाले माकड

Namdev Gharal

आफ्रीका खंडामध्ये आढळणारे De Brazza Monkey हे माकड आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे दलदली व नदीकाठच्या जंगलात आढळते ते स्वभावने शांत माकड आहे.

आफ्रिका खंडातील कॅमेरून, काँगो, गॅबॉन,सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशांमध्ये याचा प्रामुख्याने वावर असतो

याचे नाव फ्रेंच शोधक Pierre Savorgnan de Brazza यांच्या नावावरून पडले आहे. त्‍यांनी या माकडाचा शोध लावला

याला Swamp Monkey असेही म्हणतात. कारण हे नेहमी दलदलीच्या ठिकाणीच आढळते

पण याच्या चेहऱ्यावरील पांढऱ्या दाढीसारख्या पट्ट्यामुळे हे माकड अतिशय वेगळे ठरते. त्‍याची ही फ्रेंच दाढी एखाद्या मठात राहणाऱ्या हुशार साधूची आठवण करुन देते

तसेच या माकडाला असलेल्या तांबूस भुवया, राखाडी फर आणि काळे हात-पाय त्‍याच्या या दाढीवाल्या रुपात आणखी भर घालतात.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वभावाने अत्यंत लाजाळू व शांत असते इतर माकडांसारखे मोठे आवाज करत नाही.त्यामुळे याला silent primate म्हणतात.

यातील नर वजनाने मोठे साधारण 7 ते 10 किलो, तर मादी 3 ते 4 किलोची असते तसेच हे माकड मुख्यत फळे, पाने, बिया, कीटक अशा मिश्र आहारावर जगते.

हे उंच फाद्यांवर न राहता खाली, पाण्याजवळ राहतात. तसेच आवाज कमी करतात, शत्रूंपासून लपून राहण्याची सवय असते.