Anirudha Sankpal
कोकोमध्ये असलेले 'फ्लेव्हॅनॉल्स' रक्तवाहिन्या मोकळ्या करून रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात.
डार्क चॉकलेट 'बॅड' कोलेस्ट्रॉल कमी करून 'गुड' कोलेस्ट्रॉल वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते.
डार्क चॉकलेटमध्ये ७०% पेक्षा जास्त कोको असल्यास ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दुधाच्या चॉकलेटमध्येही काही प्रमाणात फायदे दिसतात, पण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते.
चॉकलेटच्या अतिसेवनामुळे साखरेचे आणि फॅट्सचे प्रमाण वाढून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, दररोज ३० ते ६० ग्रॅम डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते.
चॉकलेटचा प्रकार कोणता आहे यापेक्षा त्याचे प्रमाण (पोर्शन कंट्रोल) अधिक महत्त्वाचे आहे.
शेवटी, आरोग्यासाठी डार्क चॉकलेट निवडून ते मर्यादित प्रमाणात खाणे हेच हिताचे आहे.