पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात किंवा घाईत असताना अनेकजण बाटली किंवा ग्लास तोंडाला न लावता वरून पाणी पितात.
हवेचा शरीरात प्रवेश
वरून पाणी पिताना पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात हवा देखील शरीरात (पोटात) जाते.
पचनाच्या समस्या
ही हवा पचनसंस्थेत अडथळा निर्माण करते, ज्यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्यासारखे त्रास जाणवू शकतात.
सांधेदुखीचा धोका
उभं राहून आणि वरून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम सांध्यांवर (Joints) होतो.
किडनीवर ताण
पाणी वेगाने खाली जात असल्याने ते नीट फिल्टर होत नाही, परिणामी किडनी आणि मूत्राशयावर अतिरिक्त ताण पडतो.
पोषक तत्वांचा अभाव
अशा पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक असणारी खनिजे आणि पोषक तत्वे नीट शोषली जात नाहीत.
योग्य पद्धत कोणती?
नेहमी शांतपणे बसून, ग्लासाला ओठ लावून आणि घोट-घोट पाणी पिणे हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते.
आजच सवय बदला
जर तुम्हालाही ही चुकीची सवय असेल, तर भविष्यातील आजार टाळण्यासाठी आजच आपली पद्धत सुधारा!