Coffee Risks : सावधान! रोज कॉफी पिणे पडू शकते महागात; मेंदूवर होतोय 'हा' परिणाम

पुढारी वृत्तसेवा

संशोधनाचा धक्कादायक खुलासा

'नेचर कम्युनिकेशन' या प्रसिद्ध नियतकालिकातील एका ताज्या संशोधनानुसार, सतत कॉफी पिणे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

स्मरणशक्तीवर होतोय परिणाम

संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमित कॉफी पितात त्यांच्या तुलनेत कॉफी न पिणाऱ्यांची स्मरणशक्ती (Memory) अधिक चांगली असते.

मेंदूची कार्यक्षमता होतेय कमी

दररोज कॅफिनचे सेवन केल्याने मेंदूची माहिती साठवण्याची आणि प्रक्रिया करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

वर्तणुकीत होतोय बदल

कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये विचार न करता घाईने कृती करणे (Impulsiveness) आणि टोकाच्या भावनिक प्रतिक्रिया देण्याचे प्रमाण जास्त आढळले आहे.

आतड्यांमधील बॅक्टेरियांचा धोका

दररोज कॉफी प्यायल्याने आतड्यांमध्ये ‘क्रिप्टोबॅक्टेरियम’ आणि ‘एगर्थेला’ नावाच्या बॅक्टेरियांची संख्या वाढते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

न्यूरोट्रान्समीटरवर गदा

हे वाढलेले बॅक्टेरिया मेंदूतील महत्त्वाचे 'न्यूरोट्रान्समीटर' कमी करतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक क्षमतेवर आणि विचारांवर होतो.

सुधारणेची आशा (गुड न्यूज!)

चांगली गोष्ट अशी की, जर तुम्ही कॉफी पिणे सोडले, तर अवघ्या दोन आठवड्यांत तुमच्या वर्तणुकीत आणि मेंदूच्या कार्यात सकारात्मक सुधारणा दिसून येते.

आरोग्याला प्राधान्य द्या

अति तिथे माती! त्यामुळे उत्साहासाठी अधूनमधून कॉफी ठीक आहे, पण तिचे व्यसन टाळून मेंदूचे आरोग्य जपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.