पुढारी वृत्तसेवा
दह्याची कढी साहित्य
१ वाटी दही (किंवा ताक)
२ ते ३ चमचे बेसन पीठ
१ चमचा आलं-लसूण व मिरची पेस्ट
जिरे, मोहरी, कढीपत्ता व लाल मिरच्या
तेल, हळद, साखर आणि मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
पहिली स्टेप - ताक व बेसन एकत्र करा
एका भांड्यात रूम टेम्परेचरवरील दही किंवा ताक घ्या. त्यात बेसन पीठ आणि हळद घाला. गुठळ्या होऊ नये म्हणून रवीने किंवा मिक्सरमध्ये फिरवून मिश्रण एकजीव करा.
खमंग फोडणी द्या
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता घाला. आलं-लसूण आणि मिरची पेस्ट घालून परतून घ्या. आता तयार केलेले ताकाचे मिश्रण कढईत ओता.
कढी कशी उकळवावी?
चवीनुसार मीठ व साखर घाला. सुरुवातीला ३० सेकंद उच्च आच ठेवा, नंतर मंद आचेवर ८ ते १० मिनिटे उकळवा.
कढी सतत ढवळत राहा, अन्यथा ती फाटू शकते.
गरमागरम कढी तयार
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. मोहरी, जिरे व लाल मिरचीची वरून खमंग फोडणी घाला. डाळ-भात, चपाती किंवा भाकरीसोबत आनंद घ्या!