तुम्हाला माहिती आहे का? शक्ती, मोंथा... चक्रीवादळांना नावं पडतात कशी? 'ही' देतं कोण?

मोनिका क्षीरसागर

हिंदी महासागरात जी चक्रीवादळं निर्माण होतात त्यांना नावे देण्याचे कम 13 देशांची एक समिती करते.

याची जबाबदारी जागतिक हवामान संघटना (WMO) तसेच उष्णकटिबंधीय चक्रीवादळांवरील ESCAP समितीकडे आहे.

13 देशांमध्ये भारत, बांग्लादेश, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड, इराण, सौदी अरब या देशांचा त्यामध्ये समावेश आहे.

प्रत्येक देश आपापल्या यादीत 13 नावे सुचवतो.

जेव्हा एखादे नवीन चक्रीवादळ निर्माण होते, तेव्हा यादीतील क्रमाने पुढील नाव वापरले जाते.

समितीकडून एखाद्या देशाचे एकदा नाव वापरल्यावर ते पुन्हा वापरले जात नाही.

बंगालच्या उपसागरात नुकतेच ‘मोंथा’ चक्रीवादळ निर्माण झाले.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाला ‘मोंथा’ हे नाव थायलंड देशाने दिले आहे.

थायलंडच्या भाषेत मोंथा (Montha) म्हणजे सुगंधी फुल किंवा सुंदर फूल.

येथे क्लिक करा...