Anirudha Sankpal
सायकलिंग मुख्यतः पायाच्या स्नायूंसाठी काम करते, मात्र यामुळं काही अप्पर बॉडी पार्ट्सचा देखील व्यायाम होतो.
सायकलिंग हा कार्डियो व्यायाम आहे ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुस मजबूत होते. रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकारचा धोका कमी करतो.
सायकलिंगचा वेग आणि तीव्रतेनुसार तासाला ३००-६०० कॅलोरी जाळते, ज्यामुळे चयापचय वाढतो आणि चरबी कमी होते.
नियमित सायकलिंगमुळे रेजिस्टन्स वाढतो, एकूण श्वसनशक्ती सुधारते आणि दैनंदिन कामं सोपी वाटतात.
सायकलिंगने हिप्स आणि पाय देखील लीन होतात, वाढत्या वयामुळं स्नायूंच्या होणारी झीज देखील कमी होते.
सायकलिंगमुळे एन्झायटी कमी होते, आऊट डोअरला सायकलिंग केल्यावर मानसिक शांती देखील मिळते.
सायकल चालवताना स्नायूंचे कोऑर्डिनेशन आणि स्टॅबिलिटीची गरज असते, ज्यामुळे चलनक्षमता सुधारते, विशेषतः ज्येष्ठांसाठी फायदेशीर आहे.
सायकलिंग एकट्याने किंवा ग्रुपमध्ये देखील करता येते; ग्रुपमध्ये व्यायाम केल्यास नियमितता येते आणि मजा वाढते.
सायकलिंग सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे आणि कमी खर्चात सुरू करता येते.