Curd Rice benefits: दररोज दहीभात खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

पुढारी वृत्तसेवा

भारतात विविधतेने नटलेले अनेक चविष्ट पदार्थ आहेत. पण रोजच्या जेवणातील साधा-सोपा वाटणारा 'दहीभात' आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. नियमित दहीभात खाल्ल्याने हाडे आणि दातांना बळकटी मिळते.

जेवणानंतर पोट जड होणे किंवा अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी दहीभात उत्तम आहे. दह्यातील 'प्रोबायोटिक्स' पचन सुलभ करतात आणि आतड्यांचे आरोग्य जपतात.

दहीभातातील 'गुड बॅक्टेरिया' आतड्यांची कार्यक्षमता सुधारतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मोठी मदत होते.

दह्यामध्ये असणारे प्रोटीन स्नायू बळकट करते.

दहीभात खाल्ल्यानंतर बराच काळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार होणारी भूक नियंत्रित राहते.

दहीभातामुळे चयापचय क्रिया उत्तम राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. डाएट आणि फिटनेसबाबत जागरूक असणाऱ्यांनी दहीभाताचा आहारात नक्की समावेश करावा