Curd Rice : तुम्हाला माहिती आहे का पित्तासाठी दहीभात ठरतो रामबाण! खाण्याची योग्य वेळ कोणती?

Namdev Gharal

पूर्वी पासून आपल्याकडे दही भात खाण्याची परंपरा आहे विशेषता दक्षीण भारतात. आपल्याकडे कोणत्‍याही धार्मिक जेवणाच्या शेवटी दही भात वाढला जातो

दही भात (Curd Rice) पचनासाठी उत्तम, पौष्टिक आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा एक हलका आहार आहे

या दही भाताचे आयुर्वेदानुसार अनेक फायदेही आहेत. तसचे खाण्यासही हलका चवीष्ठ व पोटासाठी अतिशय उत्तम म्हणजे दहीभात

काही लोक म्हणतात की दही खाल्ले की सर्दी होते. हे काही अंशी खरे असले तरी दही भात हे मिश्रण मात्र आराग्यासाठी परफेक्ट आहे

दही भात पित्तासाठी सर्वोत्तम औषध आहे यामुळे पित्त कमी होते मुळात याला फोडणी दिली तर तो बाधत नाही

दहीभातामध्ये प्रो बायोटिक्स असतात त्‍यामुळे छातीतील ॲसिडीडीमुळे होणारी जळजळ कमी होते.

दहीभातावर जर तुम्ही तुप - जिऱ्याची फोडणी दिली तर त्‍यामुळे तुमचा खोकला कमी होतो, आणि सर्दीही होत नाही

कधी खावाः दही भात खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी नाश्त्‍याला घेणे किंवा दुपारी जेवल्यानंतर घेणे अधिक चांगले

कधी खाऊ नये: दहीभात रात्री खाणे शक्यातो टाळावे, कारण आर्युवेदानुसार आंबट पदार्थ रात्रीच्या जेवणात खाऊ नये