पुढारी वृत्तसेवा
काकडी शरीर हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यासदेखील मदत करते. पण तुम्हाला माहीत आहे का, की काकडी प्रत्येकासाठी फायदेशीर नाही.
काकडीमध्ये क्युकरबिटासिन नावाचे एक विशेष संयुग असते.
हे संयुग पोटात गॅस तयार होण्यास हातभार लावू शकते.
जर तुमचे पोट आधीच संवेदनशील असेल किंवा तुम्हाला वारंवार पोट फुगण्याचा त्रास असेल, तर काकडी खाणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात.
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.
फायबर आरोग्यासाठी चांगले असले, तरी जास्त प्रमाणात किंवा अचानक सेवन केल्यास ते पोटात जडपणा, वेदना आणि पेटके निर्माण करू शकते.
काकडी पचण्यास थोडी जड असते व त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रात्री वारंवार शौचालयात जाण्याची गरज भासून झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
जर तुम्हाला आधीच सर्दी, खोकला, कफ किंवा सायनसची समस्या असेल, तर काकडी खाल्ल्याने तुमची लक्षणे वाढू शकतात.