mental health tips | रडणे हे मानसिक डिटॉक्स! जाणून घ्या शास्त्रीय फायदे

पुढारी वृत्तसेवा

रडल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल (Cortisol) सारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होते, ज्यामुळे मानसिक ताण हलका होतो.

रडताना शरीरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन ही 'फील गुड' रसायने तयार होतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक वेदना कमी होण्यास मदत होते.

बायोकेमिस्ट डॉ. विल्यम फ्रे (Dr. William Frey) यांच्या संशोधनानुसार, भावनिक अश्रूंमध्ये 'स्ट्रेस हार्मोन्स' आणि इतर विषारी रसायने असतात. रडल्यामुळे ही द्रव्ये शरीरातून बाहेर टाकली जातात, ज्यामुळे शरीराचे 'डिटॉक्सिफिकेशन' होते.

अश्रूंमध्ये 'लायसोझाईम' नावाचे द्रव्य असते, जे डोळ्यांतील बॅक्टेरिया नष्ट करते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी स्वच्छ होते.

भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करणे कधीही चांगले. रडल्यामुळे मनात साचलेला निचरा होतो आणि मन पुन्हा प्रसन्न होते.

२०१५ मधील एका अभ्यासानुसार, रडल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित होते आणि मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.

२०१४ मधील एका अभ्यासानुसार, रडण्यामुळे शरीरातील पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टम (PNS) सक्रिय होते. ही यंत्रणा शरीराला आराम देण्याचे आणि पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. शरीर पुन्हा 'रिलॅक्स' मोडमध्ये येते.

दिवसभर डोळे उघडे असल्याने त्यातील आर्द्रता कमी होते आणि ते कोरडे पडतात. 'बेसल टीअर्स' डोळ्यांना ओलावा देतात. रडल्यामुळे डोळ्यांतील पडदा कोरडा पडत नाही, ज्यामुळे दृष्टी स्वच्छ राहण्यास मदत होते.

रडू आल्यास ते रोखू नका! मनमोकळं रडा आणि मनावरचा भार हलका करा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

टीप: ही माहिती इंटरनेटवर आधारित आहे. सतत रडू येत असेल किंवा नैराश्याची लक्षणे दिसत असतील, तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

येथे क्‍लिक करा.