Namdev Gharal
तुम्हाला माहिती आहे का कावळा हा सर्व पक्ष्यांमध्ये हुशार असतो. आपल्याकडे घड्या मध्ये खडे टाकून पाण्याची पातळी वाढवणाऱ्या तहानलेल्या कावळ्याची गोष्ट प्रसिद्ध आहे.
कारण त्यांची बुद्धिमत्ता चिपांझी किंवा लहान मुलांच्या बरोबरीची मानली जाते. कावळे केवळ निसर्गाचे सफाई कामगार नाहीत, तर ते अतिशय चाणाक्ष पक्षी असतात.
कावळ्याच्या शरीराच्या तुलनेत त्याच्या मेंदूचा आकार बराच मोठा असतो. त्यांच्या मेंदूमध्ये 'निडोपालियम' (Nidopallium) नावाचा भाग असतो, ज्यामुळे तो विचार करणे आणि निर्णय घेत असतो
कावळ्याच्या मेंदूतील पेशींची (Neurons) घनता खूप जास्त असते. त्यामुळे ते कमी जागेत जास्त माहिती साठवू शकतात
अजून एक म्हणजे कावळे समूहाने राहतात. एकमेकांशी संवाद साधणे, धोक्याची सूचना देणे आणि एकमेकांकडून शिकणे यामुळे त्यांची बुद्धिमत्ता विकसित झाली आहे
कावळे अशी काही कामे करतात जी इतर पक्ष्यांना (आणि काही प्राण्यांनाही) जमणे कठीण असते
यामध्ये साधनांचा वापर करतात उदाहरण: जर अन्नापर्यंत पोहोचता येत नसेल, तर ते काडीला बाक देऊन त्याचा 'हुक' तयार करतात आणि अन्नाचे तुकडे बाहेर काढतात
कावळ्यांची दुसरी क्षमता म्हणजे ते माणसांचे चेहरे लक्षात ठेवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने त्यांना त्रास दिला, तर ते त्या व्यक्तीचा चेहरा अनेक वर्षे लक्षात ठेवतात आणि त्याला पाहताच ओरडून इतरांनाही सावध करतात
कावळे अन्नाचा साठा करून ठेवतात. जर त्यांना वाटले की दुसरे कोणीतरी त्यांना बघत आहे, तर ते अन्न लपवल्याचे नाटक करतात आणि नंतर सुरक्षित ठिकाणी जाऊन ते खरोखर लपवतात.
जेव्हा एखादा कावळा मरतो, तेव्हा तिथे अनेक कावळे जमा होतात. हे केवळ दुःख व्यक्त करण्यासाठी नसते, तर तो कावळा कशामुळे मेला याचा शोध घेण्यासाठी असते