पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात आपण चेहऱ्याची, हातांची काळजी घेतो पण पायांकडे दुर्लक्ष करतो.
उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत.
त्वचेचा कोरडेपणा, शरीरात पाण्याची कमतरता, धूळ, चुकीची पादत्राणे अशी कारणे असू शकतात.
शरीरात व्हिटॅमिन ई, ए, ओमेगा-3 च्या कमतरतेने देखील टाचांना भेगा पडू शकतात.
रात्री झोपण्यापुर्वी कोमट पाण्याने पाय धुवा, नंतर टाचांना नारळाचे तेल लावून मसाज करा. यामुळे काही दिवसात टाचा मऊ होतील.
एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात 2-3 चमचे मध मिसळा. त्यात पाय 15-20 मिनिटे ठेवा. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्याने टाचा बऱ्या होतील.
कोरफडच्या जेलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिसळा. रात्री टाचांवर लावून मसाज करा. रात्रभर ठेवून सकाळी धुवून टाका. यामुळे टाचा लवकर बऱ्या होतील.
पिकलेले केळ स्मॅश करा. त्यात थोडे नारळाचे तेल मिसळा. ते मिश्रण टाचांवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी कोमट पाण्याने पाय धुवा. याचा फायदा होईल.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. आम्ही याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उपयोग करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.