Copper Water | तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे अतिसेवन ठरु शकते ‘विष’

Namdev Gharal

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आयुर्वेद आणि विज्ञानानेही याचे काही फायदे मान्य केले आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का? याचे अतिसेवन शरीरात 'विष' तयार करू शकते कसे ते पाहू

जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त तांब्याच्या संपर्कातील पाणी पितो, तेव्हा शरीरात तांब्याचे (Copper) प्रमाण वाढते.

या स्थितीला विज्ञानाच्या भाषेत 'कॉपर टॉक्सिसिटी' म्हणतात. यामुळे यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

अनेकजण २४ तास तांब्याच्या भांड्यातीलच पाणी पितात. हे चुकीचे आहे. पाणी तांब्याच्या भांड्यात किमान ८ ते १० तास साठवणे पुरेसे असते.

त्यापेक्षा जास्त वेळ उदाहरणार्थ 2 ते 3 दिवस साठवलेले पाणी प्यायल्याने तांब्याचे प्रमाण घातक पातळीवर पोहोचू शकते

जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर मळमळणे आणि उलट्या होणे. पोटात सतत दुखणे.होत असतील तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिने टाळावे असे तज्ञ सांगतात

तांब्याच्या भांड्यात कधीही लिंबू पाणी, ताक किंवा मध टाकून पिऊ नका. तांब्याचा आम्लयुक्त (Acidic) पदार्थांशी रासायनिक संयोग होतो, ज्यामुळे पाणी विषारी बनू शकते.

जर तुमच्या तांब्याच्या भांड्यावर आतून हिरवे किंवा काळे थर साचले असतील, तर ते पाणी पिणे टाळा. तो हिरवा थर म्हणजे 'कॉपर कार्बोनेट' असतो, जो शरीरासाठी अत्यंत घातक असतो.

ज्यांना किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांचे यकृत (Liver) कमकुवत आहे, अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.

दिवसातून फक्त १ ते २ ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी पुरेसे असते. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. दिवसभर साधे माठातील किंवा स्टीलच्या भांड्यातील पाणी पिणे सुरक्षित असते.