Clay Pots | मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे!

Namdev Gharal

पूर्वीच्या काळी जेवणासाठी सर्रास मातीची भांडी वापरली जायची, पण अल्यॅूमिनीअमचा शोधाने वारंवार भांडी न बदलावी लागत नसल्याने हळू हळे यांचा वापर कमी होत गेला

पण चांगल्या भाजलेल्या भांड्यांध्ये स्वयंपाक करणे आरोग्याला खूप फायदे होते. आरोग्य पोषण आणि पर्यावरण अशा तिन्ही घटकांवर वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरते

पोषक तत्वांचे रक्षण: मातीच्या भांड्यांमधून उष्णता संथ गतीने आणि सर्व बाजूंनी समान पसरते. मंद आचेवर अन्न शिजल्यामुळे अन्नातील जीवनसत्त्वे (Vitamins) आणि सूक्ष्म पोषक घटक नष्ट न होता टिकून राहतात

मातीचा मूळ स्वभाव अल्कधर्मी (Alkaline) असतो. त्यामुळे अन्न शिजताना त्यातील अतिरिक्त आम्लतेवर नैसर्गिक प्रक्रिया होऊन अन्नाचा 'pH' समतोल राखला जातो, जे पचनासाठी व गॅस-ऍसिडिटी टाळण्यासाठी उपयुक्त ठरते

कमी तेलाचा वापर: मातीमध्ये नैसर्गिक ओलावा आणि सच्छिद्र रचना असते. वाफेचे योग्य चक्रीकरण होत असल्याने अन्न स्वतःच्याच रसात शिजते, ज्यामुळे स्वयंपाकात तेल किंवा तुपाचा वापर खूप कमी करावा लागतो

शुद्ध लाल किंवा काळ्या मातीत लोह (Iron), कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि फॉस्फरस यांसारखी नैसर्गिक खनिजे असतात. या भांड्यांमध्ये शिजवल्याने हे घटक सूक्ष्म प्रमाणात अन्नात उतरतात

आधुनिक नॉन-स्टिक भांड्यांवर असणारे कोटिंग (उदा. टेफ्लॉन) जास्त तापमानावर विषारी वायू किंवा कण सोडण्याची शक्यता असते. शुद्ध मातीची भांडी पूर्णपणे विषद्रव्यमुक्त (Toxin-free) असतात

मातीच्या भांड्यातील सच्छिद्र रचनेमुळे अन्नाला एक विशिष्ट नैसर्गिक सुवास मिळतो आणि भाज्या किंवा डाळींची मूळ चव टिकून राहते

ही भांडी पूर्णपणे विघटनशील (Biodegradable) असतात. त्यामुळे ती फुटली तरी पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही

मातीची भांडी सच्छिद्र असल्याने ती स्वच्छ करताना केमिकल डिशवॉश किंवा साबण वापरू नये; कारण माती साबण शोषून घेते. ती स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी, लिंबू किंवा नारळाची काथ्या वापरावी.