पुढारी वृत्तसेवा
मोबाईलवरील डूमस्क्रोलिंग (Doomscrolling) म्हणजे सोशल मीडिया, न्यूज किंवा इतर फीडवर सतत नकारात्मक/चिंताजनक माहिती स्क्रोल करत राहणे
डूमस्क्रोलिंगमुळे जर सतत चिंता, झोपेचा गंभीर त्रास, दैनंदिन कामात अडथळा किंवा मनःस्थिती बिघडत असेल, तर हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते
ही सवय मोडण्यासाठी केवळ “फोन कमी वापरा” हे पुरेसे नसते, तर 5–10 मिनिटे चालणे, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, मित्र/कुटुंबीयांशी बोलणे, व्यायाम, छोटे घरकाम करा
तुम्ही सर्वाधिक कधी स्क्रोल करता उठल्यावर, झोपण्यापूर्वी, कामाच्या ब्रेकमध्ये? कंटाळा, चिंता, एकटेपणा किंवा तणाव असताना वापर वाढतो का? हे पहा
कोणते अॅप सर्वाधिक वेळ घेत आहे? “फक्त दोन मिनिटे” म्हणून सुरुवात करून किती वेळ जातो? याचे निरीक्षण करा
प्रत्येक सूचना मेंदूला पुन्हा फोन तपासण्याचे निमंत्रण देते. त्यामुळे सोशल मीडिया आणि न्यूज अॅप्सच्या अनावश्यक notifications बंद करा
अॅप उघडण्यामध्ये थोडा “अडथळा” निर्माण करा, सवय स्वयंचलित होऊ नये यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी अॅप्स होम स्क्रीनवरून काढून त्यांना फोल्डरमध्ये ठेवा
उठल्यानंतर पहिले 30 मिनिटे फोन नाही, जेवताना फोन नाही, काम, अभ्यासाच्या वेळी फोन दूर ठेवा, झोपण्याच्या आधी 30 ते 60 मिनिटे फोनमुक्त रहा
फोन बेडपासून दूर चार्ज करा, अलार्मसाठी स्वतंत्र घड्याळ वापरा, झोपण्यापूर्वी पुस्तक, संगीत, हलके स्ट्रेचिंग किंवा शांत संभाषण यासारखा पर्याय निवडा