Anirudha Sankpal
पावसाळ्यात दमट हवेमुळे त्वचेवर ओलसरपणा राहतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते.
वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल तर ते तुमच्या शरीरातील वाढलेल्या ब्लड शुगरचे संकेत असू शकतात.
रक्तातील साखर जास्त असल्यास बुरशीला वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते आणि प्रतिकारशक्तीही कमी होते.
जास्त साखरेमुळे घाम अधिक येतो, परिणामी काखेसारख्या त्वचेच्या घड्यांमध्ये बुरशी वेगाने पसरते.
अशा वेळी केवळ फंगल इन्फेक्शनची औषधे न घेता, तुमची ब्लड शुगर लेवल तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड असलेली क्रीम वापरू नका, कारण त्यामुळे इन्फेक्शन कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकते.
फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी त्वचा नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवा, तसेच आहारामध्ये गोड, तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा.
फंगल इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे.