Parthenium Weed | काँग्रेस गवताची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? 60 वर्षापासून शेतकऱ्याची ठरली आहे डोकेदुखी

Namdev Gharal

काँग्रेस गवत किंवा गाजर गवत ( Parthenium) ही एक अशी वनस्पती आहे जी, धान्याच्या माध्यमातून भारतात आली व इथल्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे

अमेरिकेतून आगमन: १९५० च्या दशकात भारतात धान्याची टंचाई असताना अमेरिकेतून ‘लाल गव्हाची’ आयात केली गेली. या गव्हाच्या पोत्यांसोबत काँग्रेस गवताच्या (गाजर गवत) बिया भारतात आल्या.

काँगेस गवत असे नाव का : त्या काळात देशात काँग्रेसचे सरकार होते आणि गव्हाच्या आयातीदरम्यान हे गवत आल्यामुळे लोक त्याला 'काँग्रेस गवत' म्हणू लागले.

हे गवत अतिशय प्रतिकूल हवामानात आणि कोणत्याही मातीत सहज वाढते. एकाच झाडापासून वर्षाला १० ते २५ हजार अतिसूक्ष्म बिया तयार होतात.

बिया वजनाने हलक्या असल्याने वाऱ्यासोबत आणि पाण्यासोबत अनेक किलामिटर पर्यंत सहज पसरतात. हे जमीनीत सहज वाढते यामुळे शेतजमिनीची सुपीकता वेगाने कमी होते

उत्पादनात प्रचंड घट: हे गवत जमिनीतील सर्व पोषक तत्त्वे, पाणी आणि सूर्यप्रकाश शोषून घेते, ज्यामुळे मुख्य पिकांची वाढ खुंटते.

काँग्रेस गवताच्या मुळांमधून 'पार्थेनिन' (Parthenin) नावाचे विषारी रसायन निघते, जे शेजारील पिकांना उगवू देत नाही.

मानवाला त्रास: या गवताच्या संपर्कात आल्यास किंवा परागकण श्वासात गेल्यास त्वचेची ॲलर्जी, खाज, दमा , आणि एक्झिमा यांसारखे आजार होतात.

जनावरांसाठीही घातक: जनावरांनी हे गवत खाल्ल्यास त्यांचे दूध कडू होते, यकृत खराब होते आणि अतिसेवनाने जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो.

उपाय काय : गवत लहान असताना आणि फुले येण्यापूर्वीच मुळासकट उपटून जाळून टाकावे. वेळेवर योग्य तणनाशकांची फवारणी करून याचा प्रसार रोखता येतो.