मोनिका क्षीरसागर
एकाच घरात राहणारे अनेक लोक एकमेकांचा कंगवा वापरत असतात.
कंगवा शेअर केल्याने एका व्यक्तीच्या डोक्यातील उवा (Head Lice) किंवा कोंडा (Dandruff) दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात सहज पसरू शकतो.
इतकंच नाही तर, त्वचेचे संसर्गजन्य रोग (Infectious Skin Diseases) आणि जीवाणू (Bacteria) यांचा प्रसारही होऊ शकतो.
यामुळे केस गळणे, केसांमध्ये खाज येणे आणि केसांची वाढ खुंटणे अशा समस्या वाढू शकतात.
केसांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपला स्वतंत्र कंगवा वापरावा.
तुमचा स्वतःचा कंगवाही वेळोवेळी स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, नाहीतर त्यात घाण साचून संसर्ग होऊ शकतो.
लक्षात ठेवा...कंगव्यासारख्या वस्तूंच्या बाबतीत 'शेअरिंग इज केअरिंग' लागू होत नाही.