Ice Gola: रंगीबेरंगी बर्फाचा गोळा खाण्यापूर्वी 'हे' सत्य एकदा पाहाच!
पुढारी वृत्तसेवा
वाढत जाणाऱ्या गरमीने अंगाची लाही होत असताना रंगीबेरंगी बर्फगोळा खाण्याची अनिवार इच्छा लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही अनावर करते.
मात्र बर्फ निर्मितीत वापरले जाणारे पाणी आणि गोळ्यावर टाकले जाणारे रासायनिक रंग यामुळे जुलाब, अजीर्ण, पोटाचे आजार, तोंड येणे, भूक मंदावणे यासह अन्य आजाराला बळी पडण्याची शक्यता असते.
बर्फ स्पर्शाने गार असला तरी त्याचा गूण उष्ण आहे. त्यामुळे बर्फाचे खाणे जिभेला फोड आणणारेही ठरू शकते.
यासह खाणाऱ्याची भूक मंदावणे, दाताच्या समस्या, कफ वाढणे असे आजारही होऊ शकतात.
डॉक्टर काय सांगतात?
ऋतुबदल होताना शरीरात विषाणू संक्रमणांचा धोका अधिक असतो. यावेळी बर्फगोळा खाल्यास विषाणूजन्य आजार बळावतात.
बर्फगोळे कुठे, कशा पाण्याने तयार होत आहेत, हे जाणल्याशिवाय खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण ठरु शकते.
बर्फ तयार करणाऱ्या अस्वच्छ पाण्यातूनही आजार होतात. त्यामुळे खोकला, ताप येणे, मळमळ, उलट्या, पोटाचे आजार होऊ शकतात.
घरी केलेला बर्फ आणि नैसर्गिक रंग वापरुन बर्फगोळ्याचा आनंद घेता येतो.