पुढारी वृत्तसेवा
अळू खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी बहुगुणांनी नटलेली आहे.
अळूच्या पानांचा वापर करून केलेली वडी आणि अळूचं फतफतं हे अनेक जण चवीने खातात. विविध सूप आणि करीमध्येही ही पानं वापरली जातात.
अळूमध्ये 'ए', 'बी', 'सी' जीवनसत्त्वं तसंच कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटिऑक्सिडन्टस् भरपूर प्रमाणात असतात.
अळूच्या पानांमध्ये 'अ' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मोलाची मदत होते.
अळूच्या पानांमध्ये 'फॉलेट' असते, जे गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. हे गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक असतं.
अळूच्या पानांचा रस औषधी असतो. यातील 'अँटिइंफ्लमेटरी' गुणधर्मांमुळे शरीरावरील सूज कमी होते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात.
अळूतील तंतुमय घटक पचनक्रिया सुधारतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळू फायदेशीर ठरतो.
यात असणारे 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच हाडांच्या सुदृढतेसाठी आणि स्नायूंच्या सुरळीत कार्यासाठी हे फायदेशीर आहे.
शरीरात हिमोग्लोबिन निर्माण करण्यासाठी, रक्तवृद्धीसाठी आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अळूचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
अळूची भाजी तुम्हाला फारशी आवडत नसेल, पण शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी या बहुगुणी अळूचा आहारात समावेश नक्की करा!