पुढारी वृत्तसेवा
शांत झोपेसाठी रामबाण उपाय
अनेकांना रात्री वारंवार जाग येते किंवा झोप लागत नाही, अशावेळी झोपण्यापूर्वी दूध पिणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
दूध आणि ट्रिप्टोफॅनचे कनेक्शन
दुधामध्ये 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो ॲसिड असते, जे शरीरात गेल्यावर सेरोटोनिन हार्मोन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे मन शांत होते.
थंड दूध की गरम?
तज्ज्ञांनुसार, काही लोकांसाठी थंड दूध पोटातील जळजळ कमी करून शरीराला थंडावा देते, ज्यामुळे झोप येण्यास मदत होते.
मेलाटोनिनची जादू
दुधामध्ये नैसर्गिकरीत्या मेलाटोनिन असते, हे एक असे हार्मोन आहे जे आपल्या शरीराच्या 'स्लीप-वेक' सायकलला नियंत्रित करते.
तणाव होतो कमी
दिवसभराच्या थकव्यानंतर एक ग्लास थंड दूध प्यायल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
पचनसंस्थेसाठी उत्तम
जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी फ्रिजमधील थोडे थंड दूध प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो.
कॅल्शिअमचा डोस
दुधातील कॅल्शिअम केवळ हाडांसाठीच नाही, तर मेंदूला ट्रिप्टोफॅन वापरून मेलाटोनिन तयार करण्यासाठी देखील मदत करते.
हे लक्षात ठेवा
दूध पिताना त्यात जास्त साखर टाळणे टाळावे, जेणेकरून रक्तातील साखर वाढणार नाही आणि तुम्हाला नैसर्गिकरित्या गाढ झोप लागेल.