Asit Banage
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
शरीरातील थंडावा टिकवण्यासाठीही अनेकजण नारळ पाणी किंवा ताकाचा आधार घेतात.
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियमसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते. हे प्यायल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते. तसेच हे पचायला हलके असते.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही नारळ पाणी फायदेशीर ठरते.
जर तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, तर नारळ पाणी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
ताकामध्ये 'प्रोबायोटिक्स'चे गुणधर्म असतात, जे पचनसंस्था मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ताक हा एक उत्तम पर्याय आहे. एकूणच दोन्ही पेये उन्हाळ्यात उत्तम आहेत.