पाण्याने भरलेला नारळ कसा ओळखाल? विक्रेत्याचे जबरदस्त सीक्रेट्स!

पुढारी वृत्तसेवा

नारळ निवडताना फसू नका!

बाहेरून मोठा दिसणारा नारळ आतून कोरडा असू शकतो.

वजन तपासा

आकारानुसार जड वाटणारा नारळ निवडा. हलका असेल तर पाणी कमी असण्याची शक्यता.

तीन रेषांकडे लक्ष द्या

खोल गेलेल्या रेषा दिसल्या तर नारळ जुना असतो. अशा नारळात पाणी कमी असते तो घेणे टाळा.

हलवून पाहा

जास्त “छप-छप” आवाज आला तर पाणी कमी आणि मलाई जास्त असु शकते.

रंगावरून ओळखा ताजेपणा

चमकदार हिरवा नारळ म्हणजे ताजेपणा आणि जास्त पाणी.

पिवळसर/तपकिरी रंगाचे शहाळे घेणे टाळा

असा नारळ झाडावरून काढून खूप वेळ झाला आहे. तो जुना असतो आणि आतून कोरडा निघू शकतो.

लांबट नारळ निवडा

ओव्हल (लांबट) नारळात पाणी जास्त असण्याची शक्यता.

वरचा भाग तपासा

नारळाचा वरचा भाग ओला, भेगा किंवा छिद्र असेल तर तो नारळ घेऊ नका. त्‍याला फंगसचा धोका असतो.

फुल भरलेला नारळ कसा ओळखाल?

जो नारळ हलवल्यावर ज्यात आवाज कमी येतो तोच नारळ पाण्याने भरलेला असतो.

वरील माहिती इंटरनेटवरून घेतलेली आहे. पुढारी ऑनलाईन याची जबाबदारी घेत नाही.