पुढारी वृत्तसेवा
झुरळ पाहताच अनेकांना वाटते भीती; पण त्याच्या जगण्याची ताकद थक्क करणारी!
उबदार, ओलसर आणि अंधाऱ्या ठिकाणी झुरळ राहणे पसंत करतात.
स्वयंपाकघर, बाथरूम, नाल्या आणि जुन्या वस्तूंजवळ ते सर्वाधिक दिसतात.
उरलेले अन्न, कागद, कपडे आणि मृत कीटकही झुरळ खातात.
साधारणपणे झुरळ 100 दिवसांपासून 2 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो.
काही मादी झुरळं नरांपेक्षा अधिक काळ जिवंत राहतात.
झुरळ तब्बल 40 मिनिटांपर्यंत श्वास रोखून ठेवू शकतो.
डोके नसतानाही झुरळ काही दिवस जिवंत राहू शकतो, हे ऐकून अनेकजण चकित होतात.
रात्री अंधार वाढताच झुरळ अधिक सक्रिय होतात आणि बाहेर फिरताना दिसतात.