पुढारी वृत्तसेवा
लवंगेमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात.
रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात.
झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास किंवा लवंगेचे पाणी प्यायल्यास अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील.
लवंगेत अशा काही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होण्यास मदत मिळते. झोप चांगली येईल.
लवंगेतील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर सहजरीत्या फेकले जाण्यास मदत मिळेल.
रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल.
यातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील खवखव, खोकला-सर्दी, कफच्या समस्येतून सुटका मिळेल.
रात्री झोपण्यापूर्वी लवंग चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल. तसेच तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
लवंगेचे पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल आणि यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.