पुढारी वृत्तसेवा
दालचिनी केवळ स्वयंपाकातील मसाला नसून ते एक उत्तम आयुर्वेदिक औषध आहे. हे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.
ज्यांना सतत गॅस होणे, पोट फुगणे किंवा जेवणानंतर पोट जड होणे अशा समस्या आहेत, त्यांच्यासाठी दालचिनीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते.
दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात.
दालचिनीमध्ये शरीरातील सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. दररोज याचे सेवन केल्यास सांधेदुखी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दालचिनीचे पाणी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. हे मेटाबॉलिजम सुधारून चरबी जाळण्यास मदत करते.
दालचिनीचे पाणी कसे बनवायचे?
रात्री एक ग्लास पाण्यात दालचिनीचा एक तुकडा भिजत घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.
महत्त्वाची टीप: ही माहिती सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.